देवाने आपल्याला जन्माबरोबर अनेक नाती दिली आहेत. तरीही आपल्याला मैत्रीच्या नात्याची एक वेगळी ओढ असते ., आणि एखाद्या व्यक्तीचे आपले विचार जुळले की, आपण एकमेकांचे खूप छान मित्र किंवा मैत्रिणी होतो. पण दरवेळी मैत्री टिकवण्याची धडपड एका बाजूने होत असेल तर त्या मैत्रीला किती महत्त्व द्यायला हवं याच भान असणं खूप गरजेचं असतं.
आपल्या प्रत्येकात असणारा पण न दिसणारा महत्वाचा भाग म्हणजे " मन " जे दिसत नसतानाही आपल्या जीवनमानावर खूप परिणाम घडून आणत असते .. आपले यश , अपयश , आरोग्य , व्यक्तिमत्व सर्व गोष्टीवर मनाचा प्रभाव असतो. लोक म्हणतात कि माणसाचा सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल तर ते म्हणजे त्याचे " मन " मराठीत एक म्हण आहे "जे मन चिंती ते वैरी ना चिंती, "मैत्री मनाशी" या ब्लॉग मध्ये आपण आपल्या मनाशी मैत्री करून जीवनात किती सकारात्मक बदल करू शकतो? याबद्दल बोलणार आहे , ब्लॉग आवडला तर नक्की share करा.
फॉलोअर
मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३
मैत्री म्हणजे काहींसाठी गरज पूर्ण करण्याचे साधन
शुक्रवार, २३ जून, २०२३
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यापूर्वी घ्यावयाची काळजी
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यापूर्वी घ्यावयाची काळजी :
१) किमान ६ महिने ते एक वर्षाचा कालावधी समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला समजून घेण्यासाठी देणे आवश्यक आहे. (सगळे लोक चांगलेच असतात पण आपल्याला ६ महिन्यातच लक्षात येते कि आपले इथे जमेल कि नाही) शेवटी तडजोड किती करता येईल आणि खरच त्याची तेवढी आवश्यकता आहे का ? हा हि प्रश्न महत्वाचा आहे. यावर हि विचार करावा
२) कोणताही निर्णय घाई - घाई ने घेऊ नये , तसेच आपल्या मर्यादा आपल्याला माहित असाव्या भावनेच्या भरात येऊन अशा कोणत्याही गोष्टी करू नये ज्याचा नंतर मनस्ताप आणि पश्चाताप होईल. आपण हे नाते आपल्या आनंदासाठी जोडणार आहोत, त्रास होण्यासाठी नाही याची जाणीव ठेवावी
३) कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार हे आपल्या विश्वासातील लोकांना सांगितल्याशिवाय किंवा त्यांना विचारल्याशिवाय करू नये , कितीही महत्वाचे असले तरी
४) लक्षात घ्या कि , तुम्ही आता सहजीवनासाठी आणि पुढील आयुष्य आनंदात जगता यावे यासाठी जोडीदार शोधत आहात त्यामुळे कमीत कमी जबाबदारी असणाऱ्या स्थळांना संपर्क करा. कोणाच्याही पश्चात दोघांपैकी कोणाच्याही मुलांवर एकमेकांचा भार येणार नाही याची काळजी घ्या
५) एखादा करार करून तो रजिस्टर करून घ्या.
६) प्रॉपर्टी च तुम्ही काय करणार आहेत हे दोघांच्याही मुलांना कळणे गरजेचे आहे.
७) आरोग्य विषयक जबाबदारी तुम्ही किती घेऊ शकता याचाही उल्लेख सुरवातीलाच करावा
८) एकेमकांची खरी माहिती मिळण्यासाठी कागदपत्रावर भर द्या , आणि आता ज्या वयात तुम्ही आहात या वयात तुम्ही कोणताही प्रश्न विचारण्याचा संकोच करू नका , शंकाचे निरसन व्यवस्थित करून घ्या.
९) कुठेही काही संशय आला तर संस्थेत संपर्क करून योग्य माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.
१०) झेपणार नाहीत अशी कोणतीही आश्वासने व्हाट्सअप द्वारे देऊ नका किंवा असे कोणतेही वक्तव्य करू नका ज्याचा पुढे तुमच्या मुलांना किंवा मुलींना त्रास होईल
११) अग्रीमेंट मध्ये पुढील उल्लेख जरूर करावा कि काही कारणास्तव दोघांचे जर एकमेकांसोबत पटले नाही तर वेगळे होताना काय नियम असतील ?
१२) जो पर्यंत तुम्ही आहे तो पर्यंत तुमच्या संपत्तीचे अधिकार सोडू नका,. असे म्हणतात कि , "बसायचा पाट कोणाला देऊ नये " सुरक्षिततेच्या दृष्टीने एखादे मृत्युपत्र तयार करून रजिस्टर करून ठेवा. त्याची कल्पना मुलांना देऊन ठेवा.
१३) एकदा विचार जमले , नीट ओळख झाली , विश्वास बसला कि , तुम्ही स्वतःच किंवा तो जोडीदार तुम्ही एकमेकांसाठी नक्कीच काहीतरी करणार तेही न बोलता पण हे सर्व समजायला वेळ द्यावा ;लागतो ,
१४) विवाह करणार असाल विवाह पूर्व करार करा
१५) समुपदेशन घ्या , स्वतःचे प्रोफाइल नीट काळजीपूर्वक समजून घ्या , सत्य स्वीकारा आणि भूलथापा देणाऱ्या लोकांपासून सावध रहा. शब्दावर विश्वास ठेवायचे हे दिवस नक्कीच नाही हे लक्षात असुद्या.
धन्यवाद
हेमा यादव कदम
हॅपी सिनिअर्स
९७६६२७१७४४ / ७८७५५५०७८९
गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२
मैत्री निरपेक्ष अपेक्षांचं सुंदर नातं आहे .
मैत्री म्हणजे उपकार नसून साथ आहे ,
मैत्री स्वैराचार नसून स्वातंत्र आहे,
अहंकार विस्तारला या देहाचा।
स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा॥
बळे भ्रांति हें जन्मचिंता हरावी।
सदा संगती सज्जनांची धरावी॥१६६॥
सोमवार, २५ जुलै, २०२२
रोहिडा (रोहिडेश्वर) , विचित्रगड - Rohida - vichitra gad
गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा तसेच महाबळेश्वर डोंगर रांगेमध्ये वसलेला रोहिडा (रोहिडेश्वर) हा एक महत्वाचा किल्ला आहे भोर तालुक्यात हा किल्ला येतो याची उंची साधारण ३६६० फूट इतकी आहे. रोहीड खोरे हे नीरा नदी खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या किल्ल्यास विचित्रगड असे देखील म्हंटले जाते.
पुढील माहिती हि किल्ल्यावर उपलब्ध झालेली आहे.
या गडाचा इतिहास भोज राजाच्या कालखंडापासून सुरू होतो. त्यानंतर अनेक सत्तांचा अंमल या गडावर राहिला या किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजावर मराठा व फारसी लेख असून त्यात मोहम्मद आदिलशहाच्या कारकीर्दीत इसवी सन १६५६ साली हा तिसरा दरवाजा बांधला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून हा किल्ला पहिली काही वर्ष विजापूराच्या सत्तेत तर कधी मराठ्यांच्या सत्तेत अशी सारखी अदलाबदल होत असणार हे लक्षात येते.
कृष्णाजी बांदल यांच्याकडे या किल्ल्यांची जहागिरी होती छत्रपती शिवाजी महाराजांनी बांदलांना स्वराज्यात सामील होण्याचे आमंत्रण दिले परंतु ते बांधलांनी नाकारले महाराजांनी रोहिड्यावर केलेल्या आक्रमणात कृष्णाजी बांदल मारले गेले बाजीप्रभू देशपांडे हे बांदलांचे मुख्य कारभारी होते. लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकाऱ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले ११ जून १६६५ च्या पुरंदर तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला २४ जून १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत जिंकून घेतला. कान्होजी जेधे यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचा काही भाग इनाम होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याच्या गादीवर आले त्यावेळी शिरवळ ठाण्याचा अंमलदार सय्यद मजलिस याने रोहिडा जिंकण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला त्यावेळी रोहिडा खोऱ्याचा वतनदार म्हणून बाजी सर्जेराव कारभार पाहत होते दरम्यानच्या काळात रोहिडा मोगलांकडे गेला छत्रपती संभाजी महाराजांनी सर्जेरावला अभय पत्र दिले अखेर सर्जेरावाने पुन्हा या गडावर विजय मिळवला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यात वतनदारांची तारांबळ उडाली अशातच औरंगजेबाने आपला मुलगा शहजादा आजम यास रोहिदावर पाठवले. मोघलांच्या वतनाच्या आशेने इ. स १६८९ मध्ये बाळाजी खोपडे ने रोहीड्यास वेढा घातला यावेळी रोहिडालगतची नाटंबी, करंजे , सांगवी ही गावे मोगल सैन्याने लुटून बेचिराख करून टाकली आणि किल्ला जिंकून घेतला रा . शंकरजी नारायण यांनी आपल्या पराक्रमाने इ. स १६९३ मध्ये हा किल्ला परत जिंकून घेतला.
छत्रपती राजारामांच्या काळात भोर संस्थानांची निर्मिती झाल्यावर सहा सरकारी नोकर या किल्ल्यावर होते. रा. शंकरजी नारायण यांच्यानंतर सचिव घराण्याचे वंशज पंत सचिव नारोशंकर यांचे वास्तव्य काही दिवस या गडावर होते सन १८१८ साली इंग्रजांनी अनेक किल्ल्यांचे रस्ते उध्वस्त केले, गड किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटा बंद केल्यामुळे किल्ल्यांची देखभाल न होता विध्वंस मात्र होत राहिला त्यामुळे येथे कुठलेही अवशेष शिल्लक राहिलेले नाहीत गडाच्या पायथ्याशी बाजार भरत असल्याने या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाला बाजारवाडी हे नाव पडले.
किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकमेव दरवाजा आहे याचे वैशिष्ट्य असे की आपण अगदी दरवाज्याच्या जवळ जाईपर्यंत हा दरवाजा उत्तराभिमुख असून त्याची बांधणी हिंदू मुस्लिम पद्धतीने करण्यात आली आहे. पहिल्या दरवाज्याच्या चौकटीत गणेशाची पट्टी व मिहराब आहे. येथून गडावर उजव्या बाजूने वळून वर दुसऱ्या दरवाज्याकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत आत प्रवेश केल्यावर दरवाज्याला अडगळ लावण्याची योग्य सोय केल्याचे दिसून येते तिसरे व अंतिम प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख असून दोन्ही बाजूस गज शिल्पांचे मुखवटे कोरलेले आहेत डाव्या बाजूस मराठी व उजव्या बाजूस फारसी शिलालेख कोरलेला आहे. त्यातील डाव्या बाजूला मेहराब महंमद आदिलशहा मुदपाकशाळा (स्वयंपाक घर) असे लिहिलेले आहे दुसऱ्या बाजूला जमादिल अव्वल सु. (सु म्हणजे उर्दू महिन्यातील हिजरी कालगणनेनुसार) पहिल्या महिन्यात म्हणजेच सु . १०५६ दुर्मुख सवंत्सर शके १५७८ चैत्र ते ज्येष्ठ शुद्ध १० म्हणजे १६ मार्च ते २३ मे इ. स. १६५६ यात बांधला आहे असे अनुमान निघते. कमानीच्या दोन्ही अंगास कमळे, मत्स्य आकृती कोरलेली आहे याच कमानीवर डावीकडे चंद्र तर उजवीकडे सूर्य आकृतीचे शिल्प करून दिशा दाखवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी वनक्षेत्रासंबंधी लिहिलेले एक पत्र देखील इथे ठेवण्यात आले आहे.
गडावर पाहण्यासारखी ठिकाणे :
पाण्याचे भुयारी टाके
दरवाजे
पडझड झालेल्या तटबंदी
भांडी
किल्लेदाराचे घर
भैरोबा मंदिर
शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज आणि पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत.
तसेच चुन्याचे घाणे जे आता पाहायला मिळत नाही अतिशय दुर्मिळ झाले आहे

रविवार, २४ जुलै, २०२२
Malhar gad मल्हारगड - मराठेशाहीतील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला
मल्हारगड - मराठेशाहीतील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला.
निर्मिती इ.स. १७५७ ते १७६०
भीवराव पानसे तोफखाना प्रमुख यांनी बांधलेला किल्ला
पुणे जिल्ह्यातील सासवड या सुप्रसिद्ध गावाजवळ मल्हारगड हा मराठेशाहीतील बांधलेला शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो, या किल्ल्याची उंची ३१६६ फूट इतकी आहे आणि गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर , वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत. दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे.
प्रत्येक गड किल्ला आपल्याला आपला रंजक इतिहास सांगण्यासाठी उभा आहे , या गड किल्ल्याचे संवर्धन करणे आपले म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.


शनिवार, २ जुलै, २०२२
sinhagad killa - सिंहगड आणि मी
गडाच्या उत्तरेला पुण्याच्या बाजूने आतकरवाडीतून पायी डोंगर चढून वर आले की किल्ल्यातून आत जाण्याचा पहिला दरवाजा येतो तो पुणे दरवाजा यालाच डोणजे दरवाजा असे देखील म्हणतात. मात्र हा एकच दरवाजा नसून असे एका मागोमाग एक तीन दरवाजे आहेत. पहिल्या दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूंना बुरुज व त्यावर शिल्पे आहेत. १/७/१६९३ रोजी बावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी पराक्रमाची शर्थ करून सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणला. या गोष्टीला 300 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्या पराक्रमासंबंधीचा एक संगमरवरी शिलालेख ही या दरवाजाच्या आतील बाजूस समारंभ पूर्वक बसविला आहे. या पहिल्या दरवाजातून आत आले की, थोड्याच उंचावर एक दरवाजा आहे तो म्हणजे पुणे दरवाजा क्रमांक दोन या दरवाजासंबंधी विशेष माहिती उपलब्ध नाही.
गुरुवार, ७ एप्रिल, २०२२
नात्यांच्या बदलत्या परिभाषा - लिव्ह इन - भाग १
किती तरी हजारो वर्षांपूर्वी मानव प्राण्याची निर्मिती झाली आणि तेव्हापासून आज पर्यंत अनेक युगे मागे पडत गेली रामायण झाले , महाभारत झाले , शिवकाळ लोटला , इंग्रज भारतात येऊन राज्य करून गेले एक ना अनेक गोष्टी घडल्या पण आपल्यासाठी हा आपल्या समाजाचा भूतकाळ आहे यातील कोणतीही गोष्ट या पिढीतील लोकांनी स्वतः अनुभवली नाही फक्त या सर्व गोष्टी आणि आपला प्रेरणादायी दायी इतिहास आपण वाचत आणि शिकत मोठे झालो ... संस्कार संस्कृती सर्व काही समजून घेत आयुष्याचा एक एक टप्पा पार करत चाललो आहोत. जंगलाचे आणि शहराचे नियम वेगळे असतात जंगलात काही हि चालते पण शहरात असे काही हि चालत नाही काही सुज्ञ लोकांनी समाज व्यवस्थित रहावा यासाठी काही नियमावली तयार केली व त्याप्रमाणे समाज वागू आणि जगू लागला .. त्या काळातील जातीभेद , स्त्रीपुरुष असमानता , बालविवाह , सतीप्रथा , हे सर्व काळानुसार बदलत गेले. विवाह पद्धती बदलत गेल्या फक्त चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादा असणारी स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा जोडून काम करू लागली भ्रूण हत्या कमी झाल्या मुलींची संख्या देखील वाढली म्हणजे काळाप्रमाणे सर्व गोष्टी बदलत जातात आणि समाज हे बदल स्वीकारत पुढे जातो त्यामुळे समाजात येणाऱ्या नव नवीन संकल्पनांना समाजातील काही रूढीवादी लोक विरोध करणार आणि काही सुधारणावादी त्याचा विरोध मोडून काढणार आणि काळाची आजची गरज त्यांना पटवून देणार .. हेच वर्षानुवर्षे होत आले आहे आणि होत राहणार आहे ..
ज्याप्रमाणे काळ बदलत गेला त्याप्रमाणे स्त्री - पुरुष नाते देखील बदलत गेले. नात्यांच्या परिभाषा बदलत गेल्या पूर्वीची एक म्हण होती " नवऱ्याने मारले आणि पावसाने झोडले तर तक्रार कुठे करायची " म्हणजे नवऱ्याचा मार खाणाऱ्या स्त्रीला ला कुठेही दाद मागता येत नव्हती पण आता स्त्रियांचे बाजूने इतके कायदे आहेत कि , मार तर सोडा पण शहरासारख्या ठिकाणी तर नवरे बायकांसोबत आवाज चढवून सुद्धा बोलू शकणार नाहीत .. कारण आता तक्रार करायला महिलांना हक्काची जागा आहे कायदे आहेत , महिला मुक्ती गट आहेत तसेच आर्थिक दृष्टया महिला बऱ्यापैकी सक्षम आहेत. त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेतात . पुरुष हि ते समंजस पणे स्वीकारतात आता पूर्वीसारखे राहिले नाही काळाप्रमाणे सर्व काही बदलत चालले आहे.
लिव्ह इन नावाची संकल्पना सध्या समाजात पसरत चालली आहे ., लिव्ह इन हि संकल्पना परदेशातून आली असे म्हणतात लिव्ह इन म्हणजे थोडक्यात विवाह न करता एकत्र नवरा बायको सारखे राहणे तसा मौखिक किंवा लिखित करार करणे. भारतात अजून याला कायदेशीर मान्यता नाही पण त्याला कायद्याचा विरोध देखील नाही. केस टु केस यात न्याय निवाडा केला जातो लिव्ह इन हि या काळाची गरज होत चालली आहे त्यामागे कारणे अनेक आहेत पण सर्वात महत्वाचे कारण म्हणजे घटस्फोट घेताना होणारा त्रास आणि वाया जाणारा वेळ त्यामुळे विवाह करण्यापेक्षा लिव्ह इन चा करार करून लिव्ह इन मध्ये राहण्याला लोक जास्त पसंती देताना दिसतात ज्यांचे वय ४० च्या पुढे आहे ते लोक या लिव्ह इन रिलेशनशिप ला खूप जास्त महत्व देताना दिसतात.
शनिवार, १२ मार्च, २०२२
प्रेमाचा ओलावा हवा आहे ...
प्रेमाचा ओलावा हवा आहे ...
भरकटलेल्या आयुष्याला
थोडा विसावा हवा आहे.
उन्हात फिरताना वाऱ्यातील
हलकासा गारवा हवा आहे
थकलेल्या मनाला
जरा प्रेमाचा ओलावा हवा आहे ...
हसत खेळत जगायला
खंबीर सहवास हवा आहे
माझ्यासाठी प्रचंड वेळ असणारा
मित्र हवा आहे . . .
थकलेल्या मनाला
जरा प्रेमाचा ओलावा हवा आहे ...
एकटेपणातुन बाहेर काढणारा
फक्त एकच हात हवा आहे
निस्वार्थी पणे साथ देणारा
एक आधार मला हवा आहे ...
थकलेल्या मनाला
जरा प्रेमाचा ओलावा हवा आहे ...
जगण्यासाठी कारण देणारा
भास मला हवा आहे
अजूनही आयुष्य शिल्लक असल्याचा
विश्वास मला हवा आहे.
थकलेल्या मनाला
जरा प्रेमाचा ओलावा हवा आहे ...
हेमा यादव
सोमवार, २४ जानेवारी, २०२२
विचार आणि भावना
भावना या मनाशी निगडित असतात . तर विचार हे बुद्धीशी निगडित असतात , जो पर्यंत आपण आपल्या भावनेच्या कोशात अडकून असतो तो पर्यंत कोणत्याच विचारांना पाहायला गेले तर काहीच अर्थ नसतो . लोकसत्ता मध्ये मी या संधर्भात एक लेख वाचला होता त्यामधील काही भाग मी इथे share करीत आहे त्यात असे म्हंटले होते कि ,
(लोकसत्ता ऑक्टो १६,२०१२. स. ०७:१३ )
उदा . १
माझं एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे किंवा एखादी व्यक्ती मला खूपच आवडते आणि ती व्यक्ती मला माझ्या आयुष्यात हवी आहे ( हि झाली एक छान भावना स्वप्नरंजन )
आता आपले मन आपल्या बुद्धीला सांगू लागते कि , मला ती व्यक्ती हवी आहे आता त्याला / तिला मिळवण्यासाठी आपले विचार आपली बुद्धी कामाला लागते . कधी कधी आपल्या विचारांना कळत असते कि ,काहि कारणास्तव प्रत्यक्षात हि गोष्ट होणे शक्य नाही. पण तरी देखील आपले मन आपल्या भावना हे स्वीकारायला तयार नसतात.
१) ती व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करते ?
२) त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल प्रेम असेल का ?
३) त्या व्यक्तीला आयुष्यात काय हवे आहे ?
४) त्या व्यक्तीचे एक स्वतंत्र आयुष्य आहे , त्या व्यक्तीला आपल्या पेक्षा वेगळे हि काही हवे असेल?
५) आपण समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांमध्ये बसतो का ?
६) फक्त आपण प्रेम करतो म्हणून त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावे का ?