भावना या मनाशी निगडित असतात . तर विचार हे बुद्धीशी निगडित असतात , जो पर्यंत आपण आपल्या भावनेच्या कोशात अडकून असतो तो पर्यंत कोणत्याच विचारांना पाहायला गेले तर काहीच अर्थ नसतो . लोकसत्ता मध्ये मी या संधर्भात एक लेख वाचला होता त्यामधील काही भाग मी इथे share करीत आहे त्यात असे म्हंटले होते कि ,
" बुद्धीवर भावना कशी मात करते, हे मेंदूमध्ये प्रत्यक्ष तपासण्याचे काम अॅन्ड्र वेस्टन यांनी २००४ मध्ये केले. चर्चासत्रात, वादविवादात, व्यावसायिक चर्चेत वा घरगुती गप्पांमध्ये आपला मेंदू कसा काम करतो ते या संशोधनात समजते. " समोरच्या व्यक्तीला आपण समजून घेतो आहोत, त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत आहोत असे आपण मानतो.
पण वस्तुस्थिती अगदी वेगळी असते.
आपला मेंदू नवीन माहिती ऐकायला तयारच नसतो.
तो फक्त जुने मत अधिक पक्के करीत असतो."
(लोकसत्ता ऑक्टो १६,२०१२. स. ०७:१३ )
खरं तर आपल्या मनाला जे वाटते तेच आपण करत असतो . उदा . खोटे बोलणे चूक आहे , चोरी करणे चूक आहे , कोणाचे मन कधी दुखावू नये ... इ इ .... हे झाले चांगले विचार पण हे विचार आचरणात आणणारे किती लोक आपण समाजात पाहतो
.. मानवी मनात एखादी भावना निर्माण झाली कि , लगेच च ती पूर्ण करण्यासाठी विचार पुढे येतात . आपल्या भावना आपल्याला कधीच चुकीच्या वाटत नाही . उलट आपल्याला किंवा आपल्या मनाला पटणाऱ्या गोष्टी कशा प्रकारे योग्य आहेत आणि बरोबर आहेत हे सिद्ध करण्यासाठी विचारांचा आधार घेतला जातो. आपण स्वतः सोडून बाकी लोकांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी विचार कार्य करत असतात .
उदा . १
माझं एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे किंवा एखादी व्यक्ती मला खूपच आवडते आणि ती व्यक्ती मला माझ्या आयुष्यात हवी आहे ( हि झाली एक छान भावना स्वप्नरंजन )
आता आपले मन आपल्या बुद्धीला सांगू लागते कि , मला ती व्यक्ती हवी आहे आता त्याला / तिला मिळवण्यासाठी आपले विचार आपली बुद्धी कामाला लागते . कधी कधी आपल्या विचारांना कळत असते कि ,काहि कारणास्तव प्रत्यक्षात हि गोष्ट होणे शक्य नाही. पण तरी देखील आपले मन आपल्या भावना हे स्वीकारायला तयार नसतात.
१) ती व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करते ?
२) त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल प्रेम असेल का ?
३) त्या व्यक्तीला आयुष्यात काय हवे आहे ?
४) त्या व्यक्तीचे एक स्वतंत्र आयुष्य आहे , त्या व्यक्तीला आपल्या पेक्षा वेगळे हि काही हवे असेल?
५) आपण समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांमध्ये बसतो का ?
६) फक्त आपण प्रेम करतो म्हणून त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावे का ?
हे आणि असे कोणतेही प्रश्न आपल्याला तो पर्यंत पडत नाहीत जो पर्यंत समोरची व्यक्ती आपल्याला नकार देत नाही याचे कारण फक्त इतकेच आहे कि , विचारांची कवाडे बंद करून आपण भावनांना महत्व देतो आणि कधी कधी मृगजळाच्या मागे उगीचच धावत राहतो . थोडक्यात काय तर भावना , मन हे आपल्या विचारांवर नेहमी प्रभाव पडतात आणि त्यामुळे आपण काही हि नवीन स्वीकारायला तयार नसतो पण जर आपण विचारांना महत्व दिले आणि भावनांना थोडे नियंत्रणात ठेवले तर आपले आयुष्य आहे त्या पेक्षा खूप छान होऊ शकते .. इतरांचे विचार ऐकून त्या विचारांवर सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेऊन विचार करा . योग्य काय ? अयोग्य काय ? याचा जास्त किस न पडता प्रत्येक गोष्ट फक्त बोलण्यापुरती नाही तर विचारांची कवाडे उघडी ठेऊन समजून घ्या ... थोडे कठीण आहे पण अशक्य नाही ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा