श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ वाई यांच्या वधु वर पसंती संस्थेतर्फे पुणे , मुंबई , सातारा , सांगली , कोल्हापूर , कोकण या जिल्ह्यातील ब्राह्मण तसेच मराठा समाजातील वधु वर यांच्यासाठी विशेष उपक्रम .. खालील माहिती पूर्ण वाचा मग निर्णय घ्या
१) व्हाटसअप ग्रुप :
आपण वयोगटानुसार व्हाट्सअप ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुप मध्ये तुम्हाला सहभागी करून घेतले जाईल.
आपल्या व्हाट्सअप ग्रुप चा मुख्य हेतू हा आहे कि, संस्थेच्या वेबसाईट शिवाय देखील आपल्याला इतर माध्यमातून अनेक स्थळे मिळावीत.
पालकांना वेबसाईट हाताळायला अडचण येते त्यामुळे ते व्हाट्सअप ग्रुप वरून स्थळांची यादी सहज घेऊ शकतात दर वेळी वेबसाईट साठी मुलांवर अवलंबून रहायला नको.
इतर वधु - वर संस्थांमधून येणाऱ्या verified स्थळांची यादी येथे टाकली जाते. त्यामुळे वेबसाईट वरील स्थळांसोबत तुम्हाला इतर ठिकाणची ची स्थळे एकाच ग्रुप मध्ये मिळतात.
ग्रुप मध्ये जोडले जाण्याचे शुल्क आहे ३०० रु पण वार्षिक नोंदणी करणाऱ्याना हि सेवा मोफत दिली जाते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२) ऑनलाईन मेळावे :
बऱ्याचदा वर आणि वधु या दोघांनाही प्रत्यक्ष मेळाव्यात जाणे शक्य नसते किंवा आवडत नाही त्यामुळे मेळाव्यात यांच्यापेक्षा जास्त गर्दी पालकांची होते हीच अडचण लक्षात घेऊन आपण गुगल मीट द्वारे ऑनलाईन मेळावे सुरु केले. गेल्या दिड वर्षात १५ पेक्षा अधिक मेळावे आपण घेतले आहेत आणि प्रत्येक मेळाव्यात किमान ५० हुन अधिक वधु वर सहभागी होतात कारण
मेळावा ऑनलाईन आणि कॅटेगिरी ठरवून घेतल्याने अनुरूप स्थळांना प्रत्यक्ष पाहता येते. आपण मेळाव्यात कोणालाही सहभागी करून घेत नाही वय , शिक्षण , उत्पन्न , अपेक्षा पाहून ज्यांना अनुरूप स्थळे मेळाव्यात मिळतील अशा लोकांनाच आपण सहभागी करून घेतो उगाच अनुरूप स्थळे नसताना कोणाचाही वेळ आणि पैसे खर्च करायला आम्ही सांगत नाही.
मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे शुल्क आहे ५०० रु पण वार्षिक नोंदणी करणाऱ्याना हि सेवा मोफत दिली जाते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३) मिटिंग ची सेवा :
बऱ्याचदा स्थळांना संपर्क केल्यानंतर समोरून होकार किंवा नकार काही कळवले जात नाही त्यामुळे आपल्याला समजत च नाही कि नेमकी अडचण आहे कुठे ? आपल्याला नकाराचे कारण च समजत नसेल तर तुम्ही त्यात सुधारणा करणार नाही आणि सर्व काही चांगले असताना देखील विवाह का जमत नाही याचे उत्तर स्वतः शोधत बसणार आणि नैराश्याला सामोरे जाणार .. त्याच बरोबर वेळ आणि पैसे हि खर्च होत राहणार या सर्वातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही आमची मीटिंग ची सेवा खरेदी करू शकता यात तुमच्या वतीने आम्ही स्थळांसोबत बोलून त्यांच्या शंकाचे निरसन करून तुम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे तुम्हाला नकाराचे मुख्य कारण समजू शकते व त्यावर तुम्ही काहीतरी काम करून लवकरच विवाह बद्ध होऊ शकता..
मीटिंगचे सेवा शुल्क आहे १२०० रु पण वार्षिक नोंदणी करणाऱ्याना हि सेवा मोफत दिली जाते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
४) विवाह योग :
तुमचा विवाह योग कधी आहे ? तुमच्या मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळेल का? तुमचे वैवाहिक जीवन कसे असेल हे आणि असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आपल्या संस्थेतील ज्योतिष तज्ज्ञांकडून मिळतील आणि तुमच्या मनातील गोधळ दूर होण्यास मदत होईल. (कृपया नोंद घ्या कि , जर तुमची जन्मवेळ आणि जन्मतारीख बरोबर आहे याची तुम्हाला खात्री असेल तरच पत्रिका पाहावी )
विवाह योग चे सेवाशुल्क आहे ५०१ रु पण वार्षिक नोंदणी करणाऱ्याना हि सेवा मोफत दिली जाते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५) ऑनलाईन जाहिरात :
तुम्हाला जास्तीत जास्त स्थळे मिळावी या हेतूने आपली संस्था सतत कार्यशील असते, त्यामुळे आपण तुमची वैयक्तिक माहिती कुठेही viral होणार नाही याची काळजी घेऊनच आपल्या प्रोफाइल ची आम्ही ऑनलाईन पद्धतीने जाहिरात करतो आणि अधिकाधिक स्थळांना तुमच्या पर्यंत पोहचवण्यास मदत करतो .. जाहिरात केल्यानंतर तुमच्या स्थळाची चौकशी करणाऱ्या स्थळांकडून तुम्हाला संपर्क करण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही त्यामुळे अधिकाधिक अनुरूप स्थळे तुमच्यापर्यँत पोहचण्यास मदत होते.
ऑनलाईन जाहिरातींचे शुल्क आहे १२०० रु पण वार्षिक नोंदणी करणाऱ्याना हि सेवा मोफत दिली जाते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
६) समुपदेशन :
बदलत्या काळानुसार नात्यांच्या परिभाषा बदलत चालल्या आहेत त्यामुळे वधु वर फार गोंधळात असलेले दिसतात काही वधु - वर तर सर्व काही चांगले असताना देखील उगाचच स्थळांना नकार देत असतात काही जण स्वतःला अगदी कमी लेखतात तर काही जण स्वतःला जास्तच स्मार्ट समजतात त्यामुळे नक्की त्यांना काय हवंय हे त्यांनाच माहित नसते .. त्यात घरातले ज्येष्ठ काही समजवायला गेले कि , त्यांना क्षणात गप्प केले जाते आणि शेवटी मुलांच्या हट्टापुढे पालक हतबल होऊन जातात .. समुपदेशनाच्या सेवेमुळे वधू वर यांच्या मनातील काही शंकाचे निरसन करून त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्या संस्थेतून सहकार्य केले जाते ज्या गोष्टी ते पालकांसोबत बोलत नाहीत त्या गोष्टी ते मनमोकळे पणाने आमच्यासोबत बोलू शकतात आणि सस्थेतर्फे त्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अगदी हिताचे मार्गदर्शन केले जाते.
समुपदेशन या सेवेचे शुल्क आहे ५०० रु पण वार्षिक नोंदणी करणाऱ्याना हि सेवा मोफत दिली जाते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील सर्व सेवा अतिशय महत्वाच्या आहेत , लक्षात फक्त नावनोंदणी करून वाट पाहत बसण्याने विवाह जमत नाही ज्यावेळी तुमचा योग चांगला असेल त्यावेळी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. या सर्व प्रयत्नात आम्ही आपली सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत त्यामुळे फक्त वार्षिक नोंदणी करणाऱ्या वधू वर याना वरील सर्व सेवा मोफत देण्याचा आम्ही विचार केला आहे. हि सेवा काही ठराविक काळापर्यंत मर्यादित आहे याचा सर्वानी लाभ घ्या आणि आता या वर्षात तरी विवाहबद्ध व्हाल अशी सदिच्छा .
वार्षिक नोंदणी शुल्क - २५०० रु ( १५ जानेवारी २०२२ च्या आधी नोंदणी केल्यास ५०० रु पर्यंत सवलत मिळेल. )
स्थळांना संपर्क करण्याची मर्यादा नाही.
वरील सर्व सेवा मोफत मिळतील
गुगल पे / फोन पे क्रमांक
९७६६२७१७४४
धन्यवाद
वधू वर पसंती संस्था
हेमलता यादव कदम
९७६६२७१७४४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा