काही लोक म्हणतात प्रेम राधा कृष्ण सारखे असावे ., राधा-कृष्ण प्रेम कथा म्हणजे आदर्श प्रेम कथा आणि त्यांची सर्व लोक मनोभावे पूजा करतात. अर्थात प्रत्येकाच्या श्रद्धेच्या भाग आहे त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. हजारो वर्षांपूर्वीची ती गोष्ट आहे त्या काळात ३ पत्नी ह्यात असताना देखील आज कृष्णाचे नाव राधा सोबत घेतले जाते पण जसजसा काळ बदलत गेला त्या प्रमाणे बाकी सर्व गोष्टी हि बदलत गेल्या आज भारतात एकपत्नी कायदा आहे. आता प्रेम करून दाखवावे कोणी बायको असताना लगेच कोर्टात खेचले जाल.. लिव्ह इन चा पर्याय असला तरी त्यात हि बरेच नियम अटी आहेतच !
थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्यांना कोणावर तरी प्रेम करायचे आहे आणि ते खरे आहे हे सिद्ध करायचे असेल तर स्वतःचे अस्तित्व , स्वतःचा स्वाभिमान , स्वतःचा आत्मसन्मान आणि स्वतःच्या आवडी निवडी सर्व काही वेशीला टांगायचं आणि मग प्रेमाच्या गावात प्रवेश करायचा .. बरं इतके सर्व करून तुम्हाला प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळेल याची काही शाश्वती नाही तुम्ही ज्या क्षणी प्रेमात पडलात त्या क्षणी तुम्हाला असलेला अपेक्षा या भावनेचा हक्क संपला कारण काही प्रेम वीर म्हणतात "प्रेमात अपेक्षा करायची नसते ती एक निरपेक्ष भावना आहे " प्रेम म्हणजे फक्त देण्याची गोष्ट आहे ..... अरे मग आता या भावनेपोटी लुटवून घ्यायचं का स्वतःला ? देण्याला हि काही मर्यादा असावी कि नसावी ..... म्हणजे जी व्यक्ती मनापासून प्रेम करते त्या व्यक्तीने समोरच्याला फक्त देत राहायचे आणि दुसऱ्या व्यक्तीने ते घेत राहायचे ..... कोणते लॉजिक आहे यात ? जे लोक प्रेम करतात त्यांनीच समोरच्याला समजून घ्यायचं मग प्रेम करणाऱ्यांना समजून कोण घेणार ? त्यांना काय हवंय नकोय ते कोण पाहणार ?
आजच्या संकल्पनेनुसार प्रेम हे दोन लोकांनी एकमेकांवर एकसारखे करायला पाहिजे तर या भावनेला काही अर्थ आहे. प्रेम म्हणजे स्वैराचार नाही आणि प्रेम म्हणजे लाचारी पण नाही... प्रेम एक सुंदर सद्भावना आहे ती जगता आली पाहिजे. दोन्ही बाजूनी एकसारखीच ओढ असायला पाहिजे नाहीतर तुमचे प्रेम आणि त्या भावनेला काहीच अर्थ राहणार नाही... एकतर्फी प्रेम कधीही त्रासदायकच ठरते. स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून प्रेम दाखवू नका त्याचा काहीही उपयोग होत नाही... प्रेमाच्या सर्व व्याख्या आता जुन्या झाल्या आहेत काळाप्रमाणे सर्व काही बदलत जाते मग आपण आजही प्रेमाच्या जुन्या व्याख्याच का पाठ करत आहोत सर्व काही बदलले ना तसेच प्रेमाच्या संकल्पना हि आता बदलल्या आहेत. त्या आपण स्वीकारायला पाहिजे चित्रपटात दाखवले जाणारे प्रेम आणि प्रत्यक्षात अनुभवायला मिळणारे प्रेम यात जमीन-अस्मान चा फरक आहे.
आज काल च्या प्रेमात भावनेची जागा, व्यवहाराने घेतली आहे त्यामुळे तुमच्या हि संकल्पना आता बदला "काही दिले तर काही मिळेल" नाहीतर आयुष्यभर एकटे रहाल "खऱ्या प्रेमाच्या शोधात" आणि शेवटी तुम्हाला ते लाखोंच्या गर्दीत हरवलेले दिसेल...
धन्यवाद
हेमा यादव-कदम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा