नात्यांमध्ये व्यवहार आला कि , कितीही घट्ट नाती असली तरी ती कमकुवत होतात आणि शेवटी ती तुटतात .. हे असे का होत असेल याचा विचार करण्या ऐवजी एकमेकांना दोष देऊन लोक मोकळे होतात. नात्यांमध्ये व्यवहार करूच नये असे ठामपणे आपल्या समाजात सांगितले जाते. पण चुका समजून घेण्याचे आणि यातील दोष दूर करण्याचे प्रयत्न मात्र कोणी करताना दिसत नाही. लहानपणी शाळेत "एकीचे बळ " हि गोष्ट सांगितली जायची या छोट्याश्या गोष्टींमधून त्यांना एक बोध द्यायचा होता तो असा होता कि "एक काठी तोडणे सहज शक्य आहे , तेच जर ५ काठ्या एकत्र आल्या तर त्या तोडणे मात्र कठीण आहे. " त्यामुळे त्या गोष्टीतील आजोबा त्यांच्या ५ मुलांना हा बोध एका उदाहरणातून सांगतात. आणि मुलांना ते पटते देखील. हि गोष्ट आणि यातून दिला जाणारा बोध खूप मोठा आहे. कधी याचा विचार नसेल केला तर जरूर करा.
आपल्या प्रत्येकात असणारा पण न दिसणारा महत्वाचा भाग म्हणजे " मन " जे दिसत नसतानाही आपल्या जीवनमानावर खूप परिणाम घडून आणत असते .. आपले यश , अपयश , आरोग्य , व्यक्तिमत्व सर्व गोष्टीवर मनाचा प्रभाव असतो. लोक म्हणतात कि माणसाचा सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल तर ते म्हणजे त्याचे " मन " मराठीत एक म्हण आहे "जे मन चिंती ते वैरी ना चिंती, "मैत्री मनाशी" या ब्लॉग मध्ये आपण आपल्या मनाशी मैत्री करून जीवनात किती सकारात्मक बदल करू शकतो? याबद्दल बोलणार आहे , ब्लॉग आवडला तर नक्की share करा.
फॉलोअर
रविवार, ५ डिसेंबर, २०२१
नात्यांमध्ये व्यवहार आला कि, नाती का तुटतात? - When Business it comes in relationships, why do relationships break up?
आपण जेव्हा एखाद्या बाहेरील व्यक्तीबरोबर एखादा व्यवहार सुरु करतो तेव्हा त्या व्यवहाराची सुरवात एखाद्या कराराने होते आणि मग भागीदारीत व्यवसाय सुरु होतो. येथे भावनिक व्यवहार नसतो फक्त आर्थिक व्यवहार असतो. आणि या व्यवहारात नफा - तोट्याची सर्व गणिते स्पष्ट असतात. भागीदारीच्या संमतीने सर्व निर्णय घेतले जातात. त्यामुळे इथे गैरसमजाला अजिबात जागा नसते. सर्व व्यवहारांमध्ये स्पष्टता असते. आरोप - प्रत्यारोपांना काही अर्थ नसतो. जे काही आहे ते कागद बोलत असतात त्यामुळे या "व्यावहारिक मैत्री" मधील व्यवहार संपला तरी मैत्री मात्र टिकून राहते. नाती तुटत नाहीत.
याउलट जेव्हा नात्यांमध्ये व्यवहार केला जातो तेव्हा करारापेक्षा मानपान आणि अहंकार याला जास्त महत्व दिले जाते. नात्यांमधील व्यवहार हा व्यावसायिक व्यवहार कमी पण भावनिक व्यवहार जास्त असतो. कागदपत्रापेक्षा इथे विश्वास आणि शब्द यांस जास्त महत्व असते. "भावना आणि व्यवहार" या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे आपण समजून घेण्यात आजही कमी पडतो.
जर बारकाईने विचार केलात तर कुटुंबातील किंवा नात्यातील लोकांसोबत व्यवहार किंवा व्यवसाय केला तर घरातील पैसे घरात राहणार आपल्या सोबत आपले लोक देखील प्रगती करतील. आपल्या सहकार्याने ते किंवा त्यांच्या सहकार्याने आपण असाध्य गोष्टी देखील साध्य करू शकतो. फक्त नात्यात जेव्हा आर्थिक व्यवहार येणार असतील तेव्हा काही गोष्टींची काळजी घ्या जसे कि ,
मानपान आणि शब्दांपेक्षा पेक्षा करारास महत्व द्या.
आप-आपल्या कौशल्याप्रमाणे किंवा ज्ञानाप्रमाणे कामाची विभागणी करून घ्या.
व्यवहारात स्पष्टता ठेवा. विश्वासापेक्षा कागदपत्रांना महत्व द्या. कायम लक्षात ठेवा कि व्यवहार , भावना , नातेसंबंध या सर्व गोष्टी वेग-वेगळ्या आहेत. त्यांना वेगवेगळे च ठेवायला शिका. सर्वात महत्वाचे म्हणजे व्यवहाराला "उपकार" म्हणून पाहू नका. व्यवहाराला व्यवहार म्हणूनच पहा आणि त्यात "नफा-तोटा" पहा. नात्याला मध्ये आणून त्यात मानपान अहंकार पाहू नका.
जर नात्यात कोणाला काही नवीन व्यवसाय करायचा आहे आणि आपण मदत करू शकत असाल तर तुम्ही जरूर ती करण्याचा प्रयत्न करा पण त्यात खरंच व्यावसायिक दृष्टिकोन आहे का हे देखील पहा. नसेल तर त्यांना योग्य मार्गदर्शन करा ( अर्थात त्यांची इच्छा असेल तर )
आपल्या कुटुंबातील आणि आपली सर्वांची प्रगती व्हावी हा चांगला हेतू आहे आपला त्यामुळे सर्वांच्या व्यावहारिक विचारांना कल्पनांना सामान महत्व द्या. तटस्थपणे मार्केट आणि नव्या कल्पनांचा सारासार विचार करून त्याप्रमाणे प्राधान्यक्रम मिळून ठरवा. यश-अपयशाची जबाबदारी कोण घेणार हे ठरवा . मगच आर्थिक व्यवहाराला सुरवात करा.
थोडे काळजी पूर्वक आणि भावनेला बाजूला ठेऊन जर तुम्ही कोणासोबत हि आर्थिक व्यवहार केलेत तर कधीहि तुम्हाला पच्छाताप करायची वेळ येणार नाही तुमचे नातेसंबंध व्यवहारांमुळे खराब होणार नाहीत. उलट तुमचा आदर करणाऱ्यांची संख्या वाढेल तसेच तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायात भागीदार असल्याने तुमचा आर्थिक स्थर देखील वाढण्यास मदत होईल. नात्यांमध्ये व्यवहार आला तर त्याचा फायदाच होईल फक्त त्या व्यवहारांकडे व्यवहार म्हणूनच तटस्थ पणे पहा.
तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये जरूर कळवा
धन्यवाद
हेमा यादव कदम
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Vagmi - yanche likhan chaan aahe.
उत्तर द्याहटवाEkhadyaa goshtikaday 1 vyavahasr mhanoon bagha, hey saangnay thik aahe pun pratyakshaat aanane kathin, tyasaathi prayatn karaaylaa laagtil.
उत्तर द्याहटवा