आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे प्रत्येक व्यक्ती आप-आपल्या पद्धतीने हा प्रवास त्याला जमेल आणि रुचेल त्या वाहनाचा आधार घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. हा प्रवास करत असताना यात अनेक प्रकारचे रस्ते येतात .. कधी सरळ रस्ते , कधी खड्ड्यांचे रस्ते , कधी घाट रस्ते तर कधी वळणावळणाचे रस्ते ... प्रत्येक रस्ता हा आपल्यासाठी एक सुंदर अनुभव घेऊन उभा असतो .. हा अनुभव फक्त घ्यायचा असतो त्याचा किस न पडता फक्त पाहायचा असतो आणि आलेला अनुभव हा कोणत्या कारणामुळे आला याचा हलकासा आढावा घेऊन पुढच्या रस्त्याच्या प्रवास सुरु करायला हवा ... कारण आयुष्याच्या प्रवासात जी गाडी आपल्याला मिळते ना त्याला रिव्हर्स चा पर्याय दिला जात नाही. या गाडीला फक्त पुढे जायचे इतकेच माहित असते त्यामुळे मागे काय झालं याचा विचार करून काही उपयोग होत नाही उलट आपण जर काहीतरी विचार करत कुठेही लक्ष न देता आपल्याच धुंदीत गाडी चालवत राहिलो तर अपघाताची शक्यता असते.. अपघात झाल्यानंतरची अवस्था काय होऊ शकते हे वेगळे सांगण्याची गरज नाही ...
मागील रस्त्याने दिलेला अनुभव फक्त अनुभव म्हणून पहा त्याला तुमच्या नशिबासोबत जोडण्याचा प्रयत्न करू नका, कारण टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. आपल्या समोर जशी परिस्थिती येत असते त्याप्रमाणे आपण आपली गाडी चालवत असतो. आणि ते त्यावेळी गरजेचे असते. आपण जर गाडी चालवणे थांबवले तर आपण आपल्या ध्येया पर्यंत पोहचणार कसे ?
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती स्वभावाप्रमाणे कोणी वेगात गाडी चालवणार , कोणी रमत गमत गाडी चालवणार तर कोणी अगदी हळू हळू प्रत्येक खड्डा चुकवत ट्रॅफिक चे नियम पाळत गाडी चालवणार .... प्रत्येकाची एक स्टाईल असते त्यात चूक आणि बरोबर हे हे कोण ठरवणार ?
कारण तुम्ही कितीही चांगले चालक असलात तरी आपल्यामुळे नाही, पण दुसऱ्याच्या चुकीमुळे का होईना एकदातरी अपघाताला सामोरे जावे लागतेच. चूक नसताना अपघात झाला म्हणून रुसून बसण्यात खरंच काही अर्थ आहे का ? लक्षात घ्या आपली चूक नसली तरी थोडेतरी आपले दुर्लक्ष झाले च असणार! तुम्ही "नजर हटी, दुर्घटना घटी " हि पाटी वाचली असेल कि ... ! या जगात कोणालाही असे वाटत नाही कि स्वतःची कुठेतरी चूक आहे.... कोणीही कधीही चूक मान्य करायला पुढे येत नाही ... त्यामुळे तुम्ही जरी स्वतःच्या छान आयुष्यावर रुसून बसलात तर कोणाला काहीही फरक पडणार नाही.
जसे आपण आपल्या नादात आपल्या आयुष्याची गाडी पुढे पुढे घेऊन जात असतो तसेच प्रत्येक व्यक्ती हि स्वतःच्या नादात आपला प्रवास पूर्ण करत असते.
लक्षात घ्या कि कोणालाही कोणासाठी थांबायला वेळ नाही.. तुम्ही रुसून बसलात तर तुमचा वेळ वाया जाईल आनंदाच्या काही अनमोल क्षणांना तुम्ही मुकणार आहात बाकी कोणाला काही फरक पडणार नाही.. समजून घ्या समाजात अनेक प्रवृत्तीचे लोक आहेत त्यामुळे चूक आणि बरोबर हे प्रत्येक व्यक्तीच्या समोरील परिस्थितीवर अवलंबून असते. उगाच मोठ्या मोठ्या शब्दांचे कोडे मांडून स्वतःच्या भावनांशी खेळू नका. कारण पूजा प्रभू श्री राम यांची हि होते आणि रावणाची हि होतेच.
आनंदाने जगा... प्रवासातील प्रत्येक वळणाचा आणि अनुभवाचा भरभरून आनंद घ्या .. आयुष्य खूप सुंदर आहे तुमचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला.. आयुष्यावर उगाच नाराज होऊ नका. जे आपल्याकडे नाही त्याचे दुःख करत बसण्यापेक्षा सकारत्मकतेने आशावादी राहून जे तुमच्याकडे आहे त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न करा.. चेहऱ्यावर आठ्या नको गोड हास्य खेळूद्या आपल्या या हसऱ्या चेहऱ्या मुळे कळत नकळत आपण अनेक लोकांसाठी प्रेरणा स्थान होत असतो .... आनंद घ्या आणि आनंद द्या ... बाकी काही नसते आयुष्यात ! ... आपण रडत राहिलो तरी प्रवास काही थांबणार नाही ... जगण्याचे २ च पर्याय असतात समस्या कवटाळून बसणे आणि रडत राहणे, किंवा समस्येकडे सकारात्कमतेने पाहून हसत हसत त्यातून मार्ग काढणे.
उदा . जसे कि एखाद्या घनदाट जंगलातून रस्ता माहित नसताना जीप चालवत मुख्य रोड ला आणणे. मित्रांनो हा साधा नाही आयुष्याचा खरा खुरा प्रवास आहे कधी रस्ता चुकणार तर कधी गाडी फसणार पण उत्कृष्ट चालक तोच असतो जो बसून न राहता काहीतरी प्रयत्न करतो इतरांची मदत घेऊन का होईना पण पुन्हा हसतमुखाने स्वतःची गाडी मुख्य रस्त्यावर घेऊन येतो... अजून वेळ गेली नाही स्टेरिंग आपल्याच हातात आहे... बिनधास्त पळवा गाडी काही होत नाही ... आमच्यासारखे असख्य प्रवासी आहेत कि तुमच्या सोबत ... ऑल द बेस्ट
ऑल द बेस्ट
हेमा यादव - कदम
७८७५५५०७८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा