फॉलोअर

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

विचार आणि भावना

भावना या मनाशी निगडित असतात . तर विचार हे बुद्धीशी निगडित असतात , जो पर्यंत आपण आपल्या भावनेच्या कोशात अडकून असतो तो पर्यंत कोणत्याच विचारांना पाहायला गेले तर काहीच अर्थ नसतो . लोकसत्ता मध्ये मी या संधर्भात एक लेख वाचला होता त्यामधील काही भाग मी इथे share करीत आहे त्यात असे म्हंटले होते कि , 

 बुद्धीवर भावना कशी मात करते, हे मेंदूमध्ये प्रत्यक्ष तपासण्याचे काम ॅन्ड्र वेस्टन यांनी २००४ मध्ये केले. चर्चासत्रात, वादविवादात, व्यावसायिक चर्चेत वा घरगुती गप्पांमध्ये आपला मेंदू कसा काम करतो ते या संशोधनात समजते. " समोरच्या व्यक्तीला आपण समजून घेतो आहोत, त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत आहोत असे आपण मानतो. पण वस्तुस्थिती अगदी वेगळी असते. आपला मेंदू नवीन माहिती ऐकायला तयारच नसतो. तो फक्त जुने मत अधिक पक्के करीत असतो."

(लोकसत्ता ऑक्टो १६,२०१२. .  ०७:१३ )

 खरं तर आपल्या मनाला जे वाटते तेच आपण करत असतो . उदा . खोटे बोलणे चूक आहे , चोरी करणे चूक आहे , कोणाचे मन कधी दुखावू नये ... .... हे झाले चांगले विचार पण हे विचार आचरणात आणणारे किती लोक आपण समाजात पाहतो .. मानवी मनात एखादी भावना निर्माण झाली कि , लगेच ती पूर्ण करण्यासाठी विचार पुढे येतात . आपल्या भावना आपल्याला कधीच चुकीच्या वाटत नाही . उलट आपल्याला किंवा आपल्या मनाला पटणाऱ्या गोष्टी कशा प्रकारे योग्य आहेत आणि बरोबर आहेत हे सिद्ध करण्यासाठी विचारांचा आधार घेतला जातो. आपण स्वतः सोडून बाकी लोकांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी विचार कार्य करत असतात . 

 

उदा .

माझं एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे किंवा एखादी व्यक्ती मला खूपच आवडते आणि ती व्यक्ती मला माझ्या आयुष्यात हवी आहे ( हि झाली एक छान भावना स्वप्नरंजन ) 

 

आता आपले मन आपल्या बुद्धीला  सांगू लागते कि , मला ती व्यक्ती हवी आहे आता त्याला / तिला मिळवण्यासाठी आपले विचार आपली बुद्धी कामाला लागते . कधी कधी आपल्या विचारांना कळत असते कि ,काहि कारणास्तव प्रत्यक्षात हि गोष्ट होणे शक्य नाही. पण तरी देखील आपले मन आपल्या भावना हे स्वीकारायला तयार नसतात. 

 

) ती व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करते

) त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल प्रेम असेल का ?  

) त्या व्यक्तीला आयुष्यात काय हवे आहे ?

) त्या व्यक्तीचे एक स्वतंत्र आयुष्य आहे , त्या व्यक्तीला आपल्या पेक्षा वेगळे हि काही हवे असेल?

) आपण समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांमध्ये बसतो का

) फक्त आपण प्रेम करतो म्हणून त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावे का

 हे आणि असे कोणतेही प्रश्न आपल्याला तो पर्यंत पडत नाहीत जो पर्यंत समोरची व्यक्ती आपल्याला नकार देत नाही याचे कारण फक्त इतकेच आहे कि विचारांची कवाडे बंद करून आपण भावनांना महत्व देतो आणि कधी कधी मृगजळाच्या मागे उगीचच धावत राहतो . थोडक्यात काय तर भावना , मन हे आपल्या विचारांवर नेहमी प्रभाव पडतात आणि त्यामुळे आपण काही हि नवीन स्वीकारायला तयार नसतो पण जर आपण विचारांना महत्व दिले आणि भावनांना थोडे नियंत्रणात ठेवले तर आपले आयुष्य आहे त्या पेक्षा खूप छान होऊ शकते .. इतरांचे विचार ऐकून त्या विचारांवर सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेऊन विचार करा . योग्य काय ? अयोग्य काय ? याचा जास्त किस पडता प्रत्येक गोष्ट फक्त बोलण्यापुरती नाही तर विचारांची कवाडे उघडी ठेऊन समजून घ्या ... थोडे कठीण आहे पण अशक्य नाही .. 

मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

खरे प्रेम कसे ओळखायचे ?

बऱ्याच लोकांना पडणारा हा एक ज्वलंत प्रश्न आहे कि "खरे प्रेम कसे ओळखायचे ? " कोणाला याचे उत्तर खरंच सापडले आहे का ? मुळात प्रेम हि भावनाच आयुष्यात आणि मनात गोंधळ निर्माण करणारी भावना आहे. प्रेम सिद्ध करायचं म्हणजे काय करायचं ? ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्या मनासारखं वागायचं म्हणजे खरं प्रेम सिद्ध होत का ? आणि ज्यांना समोरच्याचे मन राखता येत नाही त्यांचे प्रेम खोटे ठरवले जाते...  हे असले मापदंड लावले कोणी ? प्रेमाला कोणी कोणी समर्पण म्हणतात पण तेही एकाच व्यक्तीने करायचे का ? काही लोक म्हणतात " समोरच्या व्यक्तीला आहे तसे स्वीकारणे आणि त्या व्यक्तीच्या सुखात आपले सुख मानणे ... ! " एखाद्याला आहे तसे स्वीकारणे एक वेळ ठीक आहे पण खरंच मनापासून सांगा दुसऱ्याच्या सुखात सुख शोधणारे किती लोक या जगात आहेत किंवा असतील.... या पुढे जाऊन प्रेमाची मी अजून एक व्याख्या ऐकली कि " प्रेम म्हणजे त्याग " एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या आनंदासाठी कोणत्यातरी गोष्टीचा त्याग केला कि प्रेम खरं आहे हे सिद्ध होते . ज्याने त्याग केला त्याच प्रेम सिद्ध झालं पण समोरच्याच काय? तो स्वतःच्या स्वार्थापोटी समोरच्याला त्याग करायला लावून स्वतः मुक्त .... 

काही लोक म्हणतात प्रेम राधा कृष्ण सारखे असावे ., राधा-कृष्ण प्रेम कथा म्हणजे आदर्श प्रेम कथा आणि त्यांची सर्व लोक मनोभावे पूजा करतात. अर्थात प्रत्येकाच्या श्रद्धेच्या भाग आहे त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही.  हजारो वर्षांपूर्वीची ती गोष्ट आहे त्या काळात  ३ पत्नी ह्यात असताना देखील आज कृष्णाचे नाव राधा सोबत घेतले जाते पण जसजसा काळ बदलत गेला त्या प्रमाणे बाकी सर्व गोष्टी हि बदलत गेल्या आज भारतात एकपत्नी कायदा आहे. आता प्रेम करून दाखवावे कोणी बायको असताना लगेच कोर्टात खेचले जाल.. लिव्ह इन चा पर्याय असला तरी त्यात हि बरेच नियम अटी आहेतच ! 

थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्यांना कोणावर तरी प्रेम करायचे आहे आणि ते खरे आहे हे सिद्ध करायचे असेल तर स्वतःचे अस्तित्व , स्वतःचा स्वाभिमान , स्वतःचा आत्मसन्मान आणि स्वतःच्या आवडी निवडी सर्व काही वेशीला टांगायचं आणि मग प्रेमाच्या गावात प्रवेश करायचा ..  बरं  इतके सर्व करून तुम्हाला प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळेल याची काही शाश्वती नाही तुम्ही ज्या क्षणी प्रेमात पडलात त्या क्षणी तुम्हाला असलेला अपेक्षा या भावनेचा हक्क संपला कारण काही प्रेम वीर म्हणतात "प्रेमात अपेक्षा करायची नसते ती एक निरपेक्ष भावना आहे " प्रेम म्हणजे फक्त देण्याची गोष्ट आहे ..... अरे मग आता या भावनेपोटी लुटवून घ्यायचं का स्वतःला ? देण्याला हि काही मर्यादा असावी कि नसावी ..... म्हणजे जी व्यक्ती मनापासून प्रेम करते त्या व्यक्तीने समोरच्याला फक्त देत राहायचे आणि दुसऱ्या व्यक्तीने ते घेत राहायचे ..... कोणते लॉजिक आहे यात ? जे लोक प्रेम करतात त्यांनीच समोरच्याला समजून घ्यायचं मग प्रेम करणाऱ्यांना समजून कोण घेणार ? त्यांना काय हवंय नकोय ते कोण पाहणार ? 

आजच्या संकल्पनेनुसार प्रेम हे दोन लोकांनी एकमेकांवर एकसारखे करायला पाहिजे तर या भावनेला काही अर्थ आहे. प्रेम म्हणजे स्वैराचार नाही आणि प्रेम म्हणजे लाचारी पण नाही...  प्रेम एक सुंदर सद्भावना आहे ती जगता आली पाहिजे. दोन्ही बाजूनी एकसारखीच ओढ असायला पाहिजे नाहीतर तुमचे प्रेम आणि त्या भावनेला काहीच अर्थ राहणार नाही...  एकतर्फी प्रेम कधीही त्रासदायकच ठरते. स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून प्रेम दाखवू नका त्याचा काहीही उपयोग होत नाही...  प्रेमाच्या सर्व व्याख्या आता जुन्या झाल्या आहेत काळाप्रमाणे सर्व काही बदलत जाते मग आपण आजही प्रेमाच्या जुन्या व्याख्याच का पाठ करत आहोत सर्व काही बदलले ना तसेच प्रेमाच्या संकल्पना हि आता बदलल्या आहेत. त्या आपण स्वीकारायला पाहिजे चित्रपटात दाखवले जाणारे प्रेम आणि प्रत्यक्षात अनुभवायला मिळणारे प्रेम यात जमीन-अस्मान चा फरक आहे. 

आज काल च्या प्रेमात भावनेची जागा, व्यवहाराने घेतली आहे त्यामुळे तुमच्या हि संकल्पना आता बदला "काही दिले तर काही मिळेल" नाहीतर आयुष्यभर एकटे रहाल "खऱ्या प्रेमाच्या शोधात" आणि शेवटी तुम्हाला ते  लाखोंच्या गर्दीत हरवलेले दिसेल... 


धन्यवाद 
हेमा यादव-कदम

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ वाई यांच्या वधु वर पसंती संस्थेतर्फे ब्राह्मण तसेच मराठा समाजातील वधु वर यांच्यासाठी विशेष उपक्रम

 श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ वाई  यांच्या वधु वर पसंती संस्थेतर्फे पुणे , मुंबई , सातारा , सांगली , कोल्हापूर , कोकण या जिल्ह्यातील ब्राह्मण तसेच मराठा समाजातील वधु वर यांच्यासाठी विशेष उपक्रम .. खालील माहिती पूर्ण वाचा मग निर्णय घ्या 


२५ ते ३५ आणि ३५ ते ४५ या वयोगटातील वधु वर यांच्यासाठी खालील महत्वाच्या सेवा आपण सुरु करत आहोत. वार्षिक नोंदणी करणाऱ्या सभासदांना पुढील सेवा मोफत दिल्या जातील. फक्त नावनोंदणी करून लग्न जमत नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात या प्रयत्नांच्या दृष्टीनेच आम्ही काही सेवा आपणांस  मोफत देणार आहोत त्याची माहिती पुढील प्रमाणे: -

१)  व्हाटसअप ग्रुप : 

आपण वयोगटानुसार व्हाट्सअप ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुप मध्ये तुम्हाला सहभागी करून घेतले जाईल. 

आपल्या व्हाट्सअप ग्रुप चा मुख्य हेतू हा आहे कि, संस्थेच्या वेबसाईट शिवाय देखील आपल्याला इतर माध्यमातून अनेक स्थळे मिळावीत. 
 
पालकांना वेबसाईट हाताळायला अडचण येते त्यामुळे ते व्हाट्सअप ग्रुप वरून स्थळांची यादी सहज घेऊ शकतात दर वेळी वेबसाईट साठी मुलांवर अवलंबून रहायला नको. 

इतर वधु - वर संस्थांमधून येणाऱ्या verified स्थळांची यादी येथे टाकली जाते. त्यामुळे वेबसाईट वरील स्थळांसोबत तुम्हाला इतर ठिकाणची ची स्थळे एकाच ग्रुप मध्ये मिळतात. 

ग्रुप मध्ये जोडले जाण्याचे शुल्क आहे ३०० रु पण वार्षिक नोंदणी करणाऱ्याना हि सेवा मोफत दिली जाते.  

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------  

२) ऑनलाईन मेळावे : 

बऱ्याचदा वर आणि वधु या दोघांनाही प्रत्यक्ष मेळाव्यात जाणे शक्य नसते किंवा आवडत नाही त्यामुळे मेळाव्यात यांच्यापेक्षा जास्त गर्दी पालकांची होते हीच अडचण लक्षात घेऊन आपण गुगल मीट द्वारे ऑनलाईन मेळावे सुरु केले. गेल्या दिड वर्षात  १५ पेक्षा अधिक मेळावे आपण घेतले आहेत आणि प्रत्येक मेळाव्यात किमान ५० हुन अधिक वधु वर सहभागी होतात कारण 
मेळावा ऑनलाईन आणि कॅटेगिरी ठरवून घेतल्याने अनुरूप स्थळांना प्रत्यक्ष पाहता येते. आपण मेळाव्यात कोणालाही सहभागी करून घेत नाही वय , शिक्षण , उत्पन्न , अपेक्षा पाहून ज्यांना अनुरूप स्थळे मेळाव्यात मिळतील अशा लोकांनाच आपण सहभागी करून घेतो उगाच अनुरूप स्थळे नसताना कोणाचाही वेळ आणि पैसे खर्च करायला आम्ही सांगत नाही. 

मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे शुल्क आहे ५०० रु पण वार्षिक नोंदणी करणाऱ्याना हि सेवा मोफत दिली जाते.  
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------  

३) मिटिंग ची सेवा : 

बऱ्याचदा स्थळांना संपर्क केल्यानंतर समोरून होकार किंवा नकार काही कळवले जात नाही त्यामुळे आपल्याला समजत च नाही कि नेमकी अडचण आहे कुठे ? आपल्याला नकाराचे कारण च समजत नसेल तर तुम्ही त्यात सुधारणा करणार नाही आणि सर्व काही चांगले असताना देखील विवाह का जमत नाही याचे उत्तर स्वतः शोधत बसणार आणि नैराश्याला सामोरे जाणार .. त्याच बरोबर वेळ आणि पैसे हि खर्च होत राहणार या सर्वातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही आमची मीटिंग ची सेवा खरेदी करू शकता यात तुमच्या वतीने आम्ही स्थळांसोबत बोलून त्यांच्या शंकाचे निरसन करून तुम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे तुम्हाला नकाराचे मुख्य कारण समजू शकते व त्यावर तुम्ही काहीतरी काम करून लवकरच विवाह बद्ध होऊ शकता.. 

मीटिंगचे सेवा शुल्क आहे १२०० रु पण वार्षिक नोंदणी करणाऱ्याना हि सेवा मोफत दिली जाते. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------   
४) विवाह योग : 

तुमचा विवाह योग कधी आहे ? तुमच्या मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळेल का? तुमचे वैवाहिक जीवन कसे असेल हे आणि असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आपल्या संस्थेतील ज्योतिष तज्ज्ञांकडून मिळतील आणि तुमच्या मनातील गोधळ दूर होण्यास मदत होईल. (कृपया नोंद घ्या कि , जर तुमची जन्मवेळ आणि जन्मतारीख बरोबर आहे याची तुम्हाला खात्री असेल तरच पत्रिका पाहावी ) 

विवाह योग चे सेवाशुल्क आहे ५०१ रु पण वार्षिक नोंदणी करणाऱ्याना हि सेवा मोफत दिली जाते.    

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

५) ऑनलाईन जाहिरात : 

तुम्हाला जास्तीत जास्त स्थळे मिळावी या हेतूने आपली संस्था सतत कार्यशील असते, त्यामुळे आपण तुमची वैयक्तिक माहिती कुठेही viral होणार नाही याची काळजी घेऊनच आपल्या प्रोफाइल ची आम्ही ऑनलाईन पद्धतीने जाहिरात करतो आणि अधिकाधिक स्थळांना तुमच्या पर्यंत पोहचवण्यास मदत करतो .. जाहिरात केल्यानंतर तुमच्या स्थळाची चौकशी करणाऱ्या स्थळांकडून तुम्हाला संपर्क करण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही त्यामुळे अधिकाधिक अनुरूप स्थळे तुमच्यापर्यँत पोहचण्यास मदत होते. 

ऑनलाईन जाहिरातींचे शुल्क आहे १२०० रु पण वार्षिक नोंदणी करणाऱ्याना हि सेवा मोफत दिली जाते.   

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

६) समुपदेशन : 

बदलत्या काळानुसार नात्यांच्या परिभाषा बदलत चालल्या आहेत त्यामुळे वधु वर फार गोंधळात असलेले दिसतात काही वधु - वर तर सर्व काही चांगले असताना देखील उगाचच स्थळांना नकार देत असतात काही जण स्वतःला अगदी कमी लेखतात तर काही जण स्वतःला जास्तच स्मार्ट समजतात त्यामुळे नक्की त्यांना काय हवंय हे त्यांनाच माहित नसते .. त्यात घरातले ज्येष्ठ काही समजवायला गेले कि , त्यांना क्षणात गप्प केले जाते आणि शेवटी मुलांच्या हट्टापुढे पालक हतबल होऊन जातात .. समुपदेशनाच्या सेवेमुळे वधू वर यांच्या मनातील काही शंकाचे निरसन करून त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्या संस्थेतून सहकार्य केले जाते ज्या गोष्टी ते पालकांसोबत बोलत नाहीत त्या गोष्टी ते मनमोकळे पणाने आमच्यासोबत बोलू शकतात आणि सस्थेतर्फे त्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अगदी  हिताचे मार्गदर्शन केले जाते. 

समुपदेशन या सेवेचे शुल्क आहे ५०० रु पण वार्षिक नोंदणी करणाऱ्याना हि सेवा मोफत दिली जाते.    
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वरील सर्व सेवा अतिशय महत्वाच्या आहेत , लक्षात फक्त नावनोंदणी करून वाट पाहत बसण्याने विवाह जमत नाही ज्यावेळी तुमचा योग चांगला असेल त्यावेळी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. या सर्व प्रयत्नात आम्ही आपली सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत त्यामुळे फक्त वार्षिक नोंदणी करणाऱ्या वधू वर याना वरील सर्व सेवा मोफत देण्याचा आम्ही विचार केला आहे. हि सेवा काही ठराविक काळापर्यंत मर्यादित आहे याचा सर्वानी लाभ घ्या आणि आता या वर्षात तरी विवाहबद्ध व्हाल अशी सदिच्छा . 

वार्षिक नोंदणी शुल्क - २५०० रु ( १५ जानेवारी २०२२ च्या आधी नोंदणी केल्यास ५०० रु पर्यंत सवलत मिळेल. ) 
स्थळांना संपर्क करण्याची मर्यादा नाही. 
वरील सर्व सेवा मोफत मिळतील 

गुगल पे / फोन पे क्रमांक 
९७६६२७१७४४


धन्यवाद 
वधू वर पसंती संस्था 
हेमलता यादव कदम 
९७६६२७१७४४