आपल्या प्रत्येकात असणारा पण न दिसणारा महत्वाचा भाग म्हणजे " मन " जे दिसत नसतानाही आपल्या जीवनमानावर खूप परिणाम घडून आणत असते .. आपले यश , अपयश , आरोग्य , व्यक्तिमत्व सर्व गोष्टीवर मनाचा प्रभाव असतो. लोक म्हणतात कि माणसाचा सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल तर ते म्हणजे त्याचे " मन " मराठीत एक म्हण आहे "जे मन चिंती ते वैरी ना चिंती, "मैत्री मनाशी" या ब्लॉग मध्ये आपण आपल्या मनाशी मैत्री करून जीवनात किती सकारात्मक बदल करू शकतो? याबद्दल बोलणार आहे , ब्लॉग आवडला तर नक्की share करा.
फॉलोअर
शनिवार, १२ मार्च, २०२२
सोमवार, २४ जानेवारी, २०२२
विचार आणि भावना
भावना या मनाशी निगडित असतात . तर विचार हे बुद्धीशी निगडित असतात , जो पर्यंत आपण आपल्या भावनेच्या कोशात अडकून असतो तो पर्यंत कोणत्याच विचारांना पाहायला गेले तर काहीच अर्थ नसतो . लोकसत्ता मध्ये मी या संधर्भात एक लेख वाचला होता त्यामधील काही भाग मी इथे share करीत आहे त्यात असे म्हंटले होते कि ,
(लोकसत्ता ऑक्टो १६,२०१२. स. ०७:१३ )
उदा . १
माझं एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे किंवा एखादी व्यक्ती मला खूपच आवडते आणि ती व्यक्ती मला माझ्या आयुष्यात हवी आहे ( हि झाली एक छान भावना स्वप्नरंजन )
आता आपले मन आपल्या बुद्धीला सांगू लागते कि , मला ती व्यक्ती हवी आहे आता त्याला / तिला मिळवण्यासाठी आपले विचार आपली बुद्धी कामाला लागते . कधी कधी आपल्या विचारांना कळत असते कि ,काहि कारणास्तव प्रत्यक्षात हि गोष्ट होणे शक्य नाही. पण तरी देखील आपले मन आपल्या भावना हे स्वीकारायला तयार नसतात.
१) ती व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करते ?
२) त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल प्रेम असेल का ?
३) त्या व्यक्तीला आयुष्यात काय हवे आहे ?
४) त्या व्यक्तीचे एक स्वतंत्र आयुष्य आहे , त्या व्यक्तीला आपल्या पेक्षा वेगळे हि काही हवे असेल?
५) आपण समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांमध्ये बसतो का ?
६) फक्त आपण प्रेम करतो म्हणून त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावे का ?