देवाने आपल्याला जन्माबरोबर अनेक नाती दिली आहेत. तरीही आपल्याला मैत्रीच्या नात्याची एक वेगळी ओढ असते ., आणि एखाद्या व्यक्तीचे आपले विचार जुळले की, आपण एकमेकांचे खूप छान मित्र किंवा मैत्रिणी होतो. पण दरवेळी मैत्री टिकवण्याची धडपड एका बाजूने होत असेल तर त्या मैत्रीला किती महत्त्व द्यायला हवं याच भान असणं खूप गरजेचं असतं.
आपल्या प्रत्येकात असणारा पण न दिसणारा महत्वाचा भाग म्हणजे " मन " जे दिसत नसतानाही आपल्या जीवनमानावर खूप परिणाम घडून आणत असते .. आपले यश , अपयश , आरोग्य , व्यक्तिमत्व सर्व गोष्टीवर मनाचा प्रभाव असतो. लोक म्हणतात कि माणसाचा सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल तर ते म्हणजे त्याचे " मन " मराठीत एक म्हण आहे "जे मन चिंती ते वैरी ना चिंती, "मैत्री मनाशी" या ब्लॉग मध्ये आपण आपल्या मनाशी मैत्री करून जीवनात किती सकारात्मक बदल करू शकतो? याबद्दल बोलणार आहे , ब्लॉग आवडला तर नक्की share करा.
फॉलोअर
मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३
मैत्री म्हणजे काहींसाठी गरज पूर्ण करण्याचे साधन
मैत्री या नात्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. प्रत्येक व्यक्ती मैत्री या नात्याकडे त्याला अवगत असलेल्या त्याच्या दृष्टिकोनातून पाहते, काही लोकांना मैत्री म्हणजे टाईमपास वाटते , काही लोकांना मैत्री म्हणजे सुरक्षितता वाटते, काही लोकांना मैत्री म्हणजे मन मोकळं करण्याचे साधन वाटते , काही लोक आर्थिक गरजेतून एकमेकांचे मित्र बनतात तर काही लोक भावनेने जोडले जातात., काही लोक अगदी निस्वार्थीपणे मैत्री करतात , आणि मित्र किंवा मैत्रिणी म्हटलं की मग त्याच्यासाठी जे काही चांगल्या गोष्टी करणं शक्य आहे त्या सगळ्या करतात मग समोरच्याला त्याची किंमत असो नसो आपण आपलं करत राहायचं. पण हे कितपत योग्य आहे याचा विचार ज्याचा त्याने करावा.
आजकालच्या व्यवहारी जगामध्ये लोक स्वतःच्या स्वार्थापोटी मैत्री करतात कारण त्यांना त्यांची गरज मैत्रीच्या नात्यापेक्षा महत्त्वाची वाटत असते. मनात काहीतरी एक हेतू ठेवून मैत्री केली जाते., मग समोरच्या व्यक्तीला "मी आहे ना" म्हणून त्याच्या अडचणी लक्षात घ्यायच्या., त्या लक्षात आलेल्या अडचणी पाहून मग आपला हेतू साध्य होईपर्यंत समोरील व्यक्ती मागेल तेव्हा, त्याला / तिला हवा असेल तेव्हा प्रत्येक वेळेला त्याला / तिला वेळ द्यायचा. आणि आपला कोणत्याही प्रकारचा हेतू साध्य होण्याची वाट पाहायची., एकदा का हेतू पूर्ण झाला कि मग त्यानंतर मात्र समोरच्या व्यक्तीने भिकाऱ्यासारखा वेळ मागितला तरी त्याला वेळ नाही द्यायचा.,
थोडक्यात सांगायचं तर "मी आहे ना", पासून "मी नाही आहे ना" या प्रवासामध्ये फक्त "गरज" महत्त्वाची असते. आणि ती गरज संपली की काही लोकांना ती मैत्री संपवायची असते एक दोन वेळा मागितल्यानंतर ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल ना की समोरची व्यक्ती जाणून बुजून वेळ असताना देखील तुम्हाला वेळ देत नाही, त्या वेळेला अशा व्यक्तींपासून लांब राहायला सुरुवात करा., नाहीतर जेव्हा परत "गरज" निर्माण होईल. तेव्हा परत तुमचा वापर केला जाईल, माणूस म्हणून जगताना चुका होतात चुकीच्या व्यक्तीशी मैत्री आपण करतो चुकीच्या व्यक्तीवर विश्वास देखील ठेवतो पण ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल की, आपलं चुकलंय आपण माती खाल्ली. त्या वेळेला लगेच त्या व्यक्तीपासून दूर जाणं हा सर्वोत्तम पर्याय आहे.
एकदा चूक झाली म्हणून तिला कुर्वाळत बसण्यापेक्षा तिला मागे सोडा त्या व्यक्तीपासून दूर जा आणि आयुष्यामध्ये खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत भरपूर चांगले लोक आहेत, की जे तुमचा वापर करणार नाही.. उगाच माझ चुकलं आणि मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्यामुळे डिप्रेशन मध्ये जाण्याला काहीही अर्थ नाही.. लक्षात घ्या चूक समोरच्या व्यक्तीची नाही चूक तुमची आहे की तुम्ही "तुमच्या अडचणी सांगितल्या त्या अडचणी समजून घेऊन समोरच्या व्यक्तीने त्याचा पद्धतशीरपणे फायदा घेतला." तुम्हीच जर अडचणी सांगितल्या नसत्या तर ही वेळ आलीच नसते. तुमची चूक आहे , आता यापुढे भावनिक होऊन स्वतःचा आयुष्य खराब करून घेण्यापेक्षा चूक झाली सोडून द्यायचे परत अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यायची, विचारपूर्वक विश्वास ठेवायचा , त्या व्यक्तीला त्याच्या चुकीची जाणीव होईल किंवा नाही याचा विचार करू नका. निसर्ग स्वतःकडे काहीच ठेवत नाही तुमच्यासोबत कोण चुकीचे वागले त्या व्यक्ती सोबत पण कोणीतरी चुकीचे वागणारे भेटलंच तुम्ही मात्र त्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्याकडे वेळ नाही मागायचा कारण तुमच्याकडून गरज पूर्ण करून घेऊन ते आता कुणाच्यातरी नव्या व्यक्तीच्या शोधात असणार की आणखीन कोणाची तरी गरज समजून घेऊ आणि आणखी कोणाची तरी गरज पूर्ण करू ते झालं की, पुढे ते झालं की पुन्हा पुढे असे ते करतच राहणार .... तुम्ही तुमचा प्रवास करा त्यांना त्यांचा प्रवास करुद्या..
धन्यवाद
हेमा यादव - कदम
७८७५५५०७८९
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)