लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यापूर्वी घ्यावयाची काळजी :
१) किमान ६ महिने ते एक वर्षाचा कालावधी समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला समजून घेण्यासाठी देणे आवश्यक आहे. (सगळे लोक चांगलेच असतात पण आपल्याला ६ महिन्यातच लक्षात येते कि आपले इथे जमेल कि नाही) शेवटी तडजोड किती करता येईल आणि खरच त्याची तेवढी आवश्यकता आहे का ? हा हि प्रश्न महत्वाचा आहे. यावर हि विचार करावा
२) कोणताही निर्णय घाई - घाई ने घेऊ नये , तसेच आपल्या मर्यादा आपल्याला माहित असाव्या भावनेच्या भरात येऊन अशा कोणत्याही गोष्टी करू नये ज्याचा नंतर मनस्ताप आणि पश्चाताप होईल. आपण हे नाते आपल्या आनंदासाठी जोडणार आहोत, त्रास होण्यासाठी नाही याची जाणीव ठेवावी
३) कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार हे आपल्या विश्वासातील लोकांना सांगितल्याशिवाय किंवा त्यांना विचारल्याशिवाय करू नये , कितीही महत्वाचे असले तरी
४) लक्षात घ्या कि , तुम्ही आता सहजीवनासाठी आणि पुढील आयुष्य आनंदात जगता यावे यासाठी जोडीदार शोधत आहात त्यामुळे कमीत कमी जबाबदारी असणाऱ्या स्थळांना संपर्क करा. कोणाच्याही पश्चात दोघांपैकी कोणाच्याही मुलांवर एकमेकांचा भार येणार नाही याची काळजी घ्या
५) एखादा करार करून तो रजिस्टर करून घ्या.
६) प्रॉपर्टी च तुम्ही काय करणार आहेत हे दोघांच्याही मुलांना कळणे गरजेचे आहे.
७) आरोग्य विषयक जबाबदारी तुम्ही किती घेऊ शकता याचाही उल्लेख सुरवातीलाच करावा
८) एकेमकांची खरी माहिती मिळण्यासाठी कागदपत्रावर भर द्या , आणि आता ज्या वयात तुम्ही आहात या वयात तुम्ही कोणताही प्रश्न विचारण्याचा संकोच करू नका , शंकाचे निरसन व्यवस्थित करून घ्या.
९) कुठेही काही संशय आला तर संस्थेत संपर्क करून योग्य माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.
१०) झेपणार नाहीत अशी कोणतीही आश्वासने व्हाट्सअप द्वारे देऊ नका किंवा असे कोणतेही वक्तव्य करू नका ज्याचा पुढे तुमच्या मुलांना किंवा मुलींना त्रास होईल
११) अग्रीमेंट मध्ये पुढील उल्लेख जरूर करावा कि काही कारणास्तव दोघांचे जर एकमेकांसोबत पटले नाही तर वेगळे होताना काय नियम असतील ?
१२) जो पर्यंत तुम्ही आहे तो पर्यंत तुमच्या संपत्तीचे अधिकार सोडू नका,. असे म्हणतात कि , "बसायचा पाट कोणाला देऊ नये " सुरक्षिततेच्या दृष्टीने एखादे मृत्युपत्र तयार करून रजिस्टर करून ठेवा. त्याची कल्पना मुलांना देऊन ठेवा.
१३) एकदा विचार जमले , नीट ओळख झाली , विश्वास बसला कि , तुम्ही स्वतःच किंवा तो जोडीदार तुम्ही एकमेकांसाठी नक्कीच काहीतरी करणार तेही न बोलता पण हे सर्व समजायला वेळ द्यावा ;लागतो ,
१४) विवाह करणार असाल विवाह पूर्व करार करा
१५) समुपदेशन घ्या , स्वतःचे प्रोफाइल नीट काळजीपूर्वक समजून घ्या , सत्य स्वीकारा आणि भूलथापा देणाऱ्या लोकांपासून सावध रहा. शब्दावर विश्वास ठेवायचे हे दिवस नक्कीच नाही हे लक्षात असुद्या.
धन्यवाद
हेमा यादव कदम
हॅपी सिनिअर्स
९७६६२७१७४४ / ७८७५५५०७८९