फॉलोअर

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

" भीती " समाजाची वाटते कि , " फसवणुकीची "

 

" भीती " समाजाची वाटते कि , " फसवणुकीची "

पन्नाशी ओलांडल्यानंतर एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांना एकटेपण जेव्हा त्रास देऊ लागते.  ना तेव्हा  त्यांना जोडीदाराची गरज भासू लागते . कारण मित्र-मैत्रीण परिवाराच्या हि काही मर्यादा असतात . आणि त्यामुळे हक्काचं कोणीतरी आपल्या आयुष्यात असायला पाहिजे असे वाटणे यात काहीच गैर नाही. 

पुनर्विवाह किंवा लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीच्या सततच्या येणाऱ्या बातम्यांमुळे ५० ते ६५ हा वयोगट कुठेतरी मानसिक गोधळात असलेला दिसून येतो. 

 यांच्या मनात येणारे काही प्रश्न : 

 प्रश्न १ : . या वयात  पुनर्विवाह किंवा लिव्ह इन रिलेशनशिप चा निर्णय घेणे योग्य आहे का

उत्तर :  होय तुम्ही जर एकटे असाल तर हेच योग्य वय आहे हा निर्णय घेण्याचा.  कारण ७० वर्षानंतर जोडीदार मिळण्याची शक्यता थोडी कमी होते.  आणि खऱ्या अर्थाने तेव्हा कोणीतरी आपल्या व्यक्तीच्या मायेच्या स्पर्शाची आपल्याला गरज असते.  जर आता हा निर्णय नाही घेतला तर उशीर होईल ...... विचार करा 

 

प्रश्न २ : आमच्या संपत्तीचे काय होणार

उत्तर : तुमच्या संपत्तीचे काय करायचे हा निर्णय सर्वस्वी तुमचा असतो . तुम्ही तसे agreement  करू शकता. आणि जी व्यक्ती तुमचा आधार होणार आहे त्या व्यक्तीला काहीतरी देणे हि तुमची जबाबदारी असणार आहे . 

 प्रश्न ३ : आमची फसवणूक होईल का ? 

उत्तर : " फसवणूक तेव्हाच होऊ शकते, जेव्हा आपण स्वतःहून कोणाला फसवणुकीची संधी देतो. " 

 ज्येष्ठांमध्ये एका गोष्टींचा आभाव मला जाणवतो तो म्हणजे त्यांना स्वतःवर खूप विश्वास असतो. त्यांना असे वाटते कि, आम्ही आयुष्यात इथपर्यंत आलो आहोत.  आता आमचे निर्णय  आम्ही घेऊ शकतो.  आणि आता या वयात आमचे निर्णय चुकणे शक्यच नाही.  याच अति आत्मविश्वासामुळे गोष्टी शेअर करण्याचे प्रमाण कमी होते.  

आपण काय करतोय

कोणाला भेटत आहे ?  

हे घरातल्या लोकांना किंवा मित्रपरिवारात सांगण्याची त्यांना गरज वाटत नाही.  आणि इथेच फसवणुकीची मेढ रोवली जाते. 

फसवणूक होऊ नये या साठी घ्यावयाची काळजी : 

 १. तुम्ही लिव्ह इन किंवा पुनर्विवाह चा विचार करताय सर्वात आधी हे घरात सांगा . 

२. तुम्ही कोणाला डेट करत असाल तर त्यांच्या घरातील लोकांना भेटा.  

३. संस्था किंवा जवळच्या व्यक्तीच्या सल्ल्या शिवाय आर्थिक व्यवहार करू नका . 

४. कोणत्याही गोष्टी लपवू नका .

५. निर्णय घेण्यापूर्वी काही काळ त्या व्यक्तीसोबत मित्र - मैत्रीण म्हणून रहा. पण फक्त एन्जॉयमेंट म्हणून नाही तर त्या व्यक्तीची "स्वभाव ओळख" करून घ्या . 

६. विवाहपूर्व / लिव्ह इन पूर्व ऍग्रीमेंट केल्याशिवाय पुढे जाऊ नका . 

 

प्रश्न : स्वभाव जुळतील का ? माझ्यासारखेच कोणी असेल का ? 

उत्तर : वाढत्या वयाप्रमाणे जसे आपण आपला स्वभाव बदलू शकत नाही.  त्या प्रमाणे समोरील व्यक्ती सुद्धा या वयात स्वतःमध्ये फारसे बदल करू शकणार नाही. याची जाणीव मनात राहू द्या त्याच्या / तिच्या सवयी आपण या वयात सहन करू शकतो का ? याचा विचार करा. आयुष्यात जसा आपण संघर्ष केलाय तसाच तो समोरच्याने देखील केला आहे . आणि त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे नुकसान झाले नाही.  त्यामुळे त्या व्यक्तीला चूक किंवा बरोबर म्हणण्याचा आता प्रश्नच नाही . आता फक्त आपण त्या व्यक्तीला "आहे  तसे स्वीकारू शकतो का ? " हा प्रश्न स्वतःला विचारा. 

 

प्रश्न : मला लिव्ह इन किंवा पुनर्विवाह नको मला फक्त मित्र - मैत्रीण पाहिजेत. मिळणार का ? 

उत्तर  :  हो नक्की मिळणार पण ते फक्त मित्र - मैत्रीणच राहणार हे लक्षात घ्या. तुमच्या घरातले एकटेपण या नात्याने दूर नाही होणार . कारण मैत्री आणि प्रेम किंवा विवाह या सर्व नात्यांमध्ये एक धूसर पुसट अशी रेषा असते जी या नात्यांमधील वेगळेपण वेळ आल्यावर दाखवून देते. हि नाती जरी एकसारखी वाटत असली तरी त्याच्या काही मर्यादा आहेत . "आपण ४० वर्षाच्या आतील लोकांना असे म्हणतो का ? कि मुलांनो लग्न नका करू मित्र - मैत्रीण म्हणून राहा . " हे आपण नाही सांगत कारण "जोडीदार" म्हणजे नक्की काय हे आपल्याला माहित आहे . तसेच ५० - ६५ वयात जोडीदार नको फक्त मित्र - मैत्रीण पाहिजे हे म्हणणे तितकेच चुकीचे आहे . आताचा तात्पुरता विचार करून निर्णय नका घेऊ . मैत्री - प्रेम - विवाह यातील धूसर रेषा ओळखा. नात्यांच्या मर्यादा समजून घ्या . आणि हे योग्य वय हातातून जाऊ देऊ नका . कारण सत्तरी नंतर चे एकटेपण जास्त त्रासदायक असते . 

 

प्रश्न : लोक काय म्हणतील

उत्तर : लोक काही हि म्हणत नाहीत . सर्व आपल्या सुपीक मनाचे खेळ असतात. कोणाला हि इतका वेळ नाही कि तुमच्या मागे २४ तास फिरून तुमच्यावर चर्चा करत बसतील. आपण जे विचार करतो तेच विचार चित्र रूपाने कधीतरी आपल्या समोर येऊन उभे राहतात . त्यामुळे तुम्ही सकारात्मक विचार करा. तुम्ही स्वतः म्हणालात ना कि मी चूक केली तरच लोकं त्याला चूक म्हणतात.  खूप उदाहरणे आहेत समाजात अशी कि , मोठं-मोठया चुका त्यांच्या समाजाने मान्य नसताना स्वीकारल्या आहेत. मग तुम्ही तर चूक करत नाही तुमच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केलात तर  लिव्ह इन आणि पुनर्विवाह हि तुमच्या जीवनाची गरज आहे आणि ती तुम्ही योग्य पद्धतीने पूर्ण करायला पाहिजे . 

तुम्ही जेव्हा घरात एकटे आजारी असता मानसिक दृष्ट्या खचलेले असता ना तेव्हा लोकं फक्त "अरेरे .... " इतकेच म्हणतात या पेक्षा जास्त काही हि नाही. आणि ते तुमची मदत करायलाही येत नाहीत .. शहरांसारख्या ठिकाणी तर घरात ज्येष्ठांचा मृत्यू होतो आणि २-३ दिवस कोणाला कळत हि नाही. त्यामुळे तुम्ही विचार करा कि , "अरेरे .... " म्हणणाऱ्या लोकांचं ऐकायचं कि , स्वतःच्या मनाचं आणि भविष्याचं ......... ? 

    लिव्ह इन आणि पुनर्विवाह साठी ऑफिस मध्ये चौकशी साठी येणाऱ्या लोकांकडून हे प्रश्न मला बऱ्याचदा विचारले जातात आणि त्यामुळे आज थोडे या वर लिहावे असे वाटले. सर्व ज्येष्ठाना मला फक्त इतकेच सांगायचे आहे कि , "वयाप्रमाणे फक्त शरीर थकते मन कधीही थकत नाही . मन कायम तरुण असते . जसे कि , देवानंद यांनी तर वयाच्या ९० वर्षानंतर हि सिनेमा काढला. " वय हा फक्त एक आकडा आहे " तर आयुष्याचे इतके अनुभव घेतल्यानंतर हि जर तुम्ही विनाकारण नको त्या प्रश्नांमध्ये अडकून स्वतःचे आयुष्य एकटे राहून वाया घालवत असाल तर वेळीच विचार करा . पटकन तुमच्यासाठी योग्य असेल तो निर्णय घ्या आणि विचारांच्या जाळ्यातून मोकळे व्हा . कोणावर अपेक्षा लादू नका आणि कोणाकडून अपेक्षा करू नका . जसे लहानपणी ( १० वर्षाच्या आधी ) वर्तमानात जगत होतात आता तसे कसलाही विचार न करता निरागस पणे वर्तमानात जगायला सुरवात करा . पहा आयुष्य किती आनंदी होऊन जाईल ते ..  

 

आपल्याला भावी जीवनासाठी शुभेच्छा आणि माझ्या या लेखातून आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील अशी अपेक्षा ... 

धन्यवाद 

हेमलता यादव-कदम